प्रतिनिधी/सातारा
खेड, ता. सातारा येथील सहकार नगरमध्ये अज्ञात चोरटय़ांनी घरफोडी कडून 2 लाख 7 हजार 750 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. यामध्ये 15 हजार रूपये रोख रकमेचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 जुन रोजी 2. 15 ते दि. 29 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास खेड ता सातारा येथील सहकार नगरमध्ये तेथीलच मुबारक महम्मद सय्यद वय 60 यांच्या राहत्या घराच्या खोलीच्या दरवाजाची कडी कोयंडा कशाचा तरी साह्याने तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरटय़ांनी 62 हजार रुपये किमतीच्या अडीच तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठय़ा, 25 हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाचे सोन्याची चैन, 31 हजार 250 रुपये किमतीची एक तोळा वजनाची सोन्याची गलसर, 25 हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाचे गंठण, 12 हजार 500 रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे सोन्याची बोरमाळ, 20 हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक, 12 हजार 500 रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे गाण्यातील फॅन्सी टॉप, 4 रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट आणि 15 हजार रुपये रोख रक्कम असे एकूण सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम 2 लाख 7 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटय़ांनी हस्तगत केला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे.