अभिनेत्री तारा सुतारिया ही निर्माते मुराद खेतानी यांच्या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे. ताराने त्यांच्या या चित्रपटाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. अभिनेत्रीच हा पहिला सिंगल लीड चित्रपट असणार आहे. हा एक थ्रिलर-ड्रामा धाटणीचा चित्रपट असून यात तारा वेगळय़ा प्रकारची भूमिका साकारणार आहे. निर्माते लवकरच या चित्रपटाची आणि तारा मुख्य नायिका असल्याची अधिकृत घोषणा करणार आहेत.
ताराने स्टुडंट ऑफ द ईयर-2 या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले असले तरीही त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता. तारा अलिकडेच सुनील शेट्टीचा पुत्र अहानसोबत तडप या चित्रपटात दिसून आली होती. कपूर घराण्याशी संबंधित अदर जैन याच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे तारा चर्चेत राहते.