निवडणूक नाऱयाने मिळवून दिला होता ऐतिहासिक विजय
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गाजलेल्या ‘खेला होबे’ नाऱयाला आता ममता बॅनर्जींचे सरकार एका पूर्ण कार्यक्रमाचे स्वरुप देणार आहे. ममता सरकारने राज्यात ‘खेला होबे दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. फुटबॉलसाठी प्रसिद्ध बंगालमध्ये क्रीडाविकासाच्या दिशेने हा दिवस साजरा करण्याचा मनोदय आहे.
सरकार राज्यात खेला होबे दिवस आयोजित करणार आहे. राज्यातील विविध फुटबॉल क्लब्सना 50 हजार फुटबॉलही दिले जातील अशी घोषणा ममता बॅनर्जी यानी विधानसभेत केली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत खेला होबे या नाऱयाचा जोरदार वापर झाला होता.
तृणमूल काँग्रेसचे नेते देबांग्शू भट्टाचार्य यांनी या शब्दांचा वापर करत एक गाणे लिहिले होते. या गाण्याची चित्रफित युटय़ूबवर अपलोड करण्यात आल्यावर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ममता बॅनर्जी यांनी स्वतः देखील अनेक प्रचारसभांमध्ये या नाऱयाचा उल्लेख केला होता.