नवी दिल्ली : 2021 साली होणाऱया ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडास्पर्धेमध्ये शासनाने योगासन या नव्या क्रीडाप्रकाराचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी केली.
खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धेचा अधिक विकास आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी ही स्पर्धा अधिक स्पर्धात्मक बनविण्याचे शासनाचे प्रयत्न चालू आहेत. संसदेमध्ये विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय क्रीडामंत्री रिजिजू यांनी सदर खुलासा केला आहे. शासनातर्फे भारतीय योगासन क्रीडा फेडरेशनला अधिकृत मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशामध्ये योगासनाचा प्रसार झपाटय़ाने करण्याकरिता शासनाचे प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले.