वाळपई / प्रतिनिधी
खोडये सत्तरी येथील क्?ष्णप्रसाद गाडगीळ यांच्या शेतकी फार्मच्या परिसरात आलेल्या हरणाला वाळपई वनखात्याच्या कर्मचारी वर्गाने ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहीती नूसार आज बुधवारी दुपारी खोडये येथे गाडगीळ यांच्या शेतकी फार्मवर एका ठिकाणी हरण आल्याचे निदर्शनास आले. याची माहीती वाळपई वनखात्याचे रेस्कूस कर्मचारी विशांत गावकर यांना मिळताचा गावकर याने खोडये येथे जागेत जाऊन हरणाच्या भ्रमणाची पहाणी केली. हरण कशा परिस्थितीत आहे. याची पडताळणी केल्यावर विशांत याने फोरेष्टर यांना माहीती दिली. फोरेष्टर महादेव गावकर, जयराम गावकर, चालक सुरेश कुमार, कर्मचारी प्रदीप गावकर, क्?ष्णा गावकर आदीजण खोडये येथे दाखल झाले. सोबत पिंजराही आणला होता. विशांत याने अगदी अलगद हरणाला पकडले व पिंजर्यात सुरक्षित ठेवले. व नंतर वाळपई येथे वनखात्यात आणण्यात आले. सदर हरणाच्या अंगावर जंगली प्राण्याचा पंजा लागलेला आहे. बहुतेक बिबटय़ा वाघाच्या तावडीतून हे हरण सुटून शेती फार्ममध्ये पोहचले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. आपल्या सत्तरीच्या जंगलात हरणा सारखे देखील प्राणी वस्ती करुन आहेत. हरणाचा अधिवास जंगलात बराच असल्याचे स्पष्ट झाले आहे.