वार्ताहर / यड्राव
हातकणगंले तालुक्यातील गौरीशंकर नगर खोतवाडी येथील दानम्मा मंदिर परीसरात असणारा दारु अडुयावर सतंप्त महिलांनी हल्ला बोल करीत दारू अड्डा उधळून लावला. यावेळी महिलांनी दारू बंदीच्या घोषणा देत निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच या परीसरात दारू अड्डा चालु देणार नाही असा इशारा देत पोलीसांची कानउघडणी केली.
गौरीशंकर नगर परीसरात सात गावठी दारू अड्डे खुले आम चालु आहेत. दोन दिवसा पूर्वीच पोलीसांनी धाड टाकत दारू अड्डा बंद केला होता. पण पोलीसांनी केलेल्या जुजबी कारवाई व काही लोकप्रती निधींचे अवैध धंद्याना पाठराखण यामुळे परत हे दारू अड्डे खुलेआम चालु झाले. त्यामुळे संतप्त महिलांनी दारू अड्डा चालकाबरोबर वादावादी करत दगडफेक करण्यात आली. यावेळी अड्डा चालक यांनी पोलीसांना आम्ही हप्ते देत आहोत. तुम्ही त्यानाच याबाबत विचारु शकता असे वांरवार अड्डे चालक सांगत होते. त्यामुळे या परिसरातील महिला संघटनानी या भागात परत दारुअड्डे सुरु झाल्यास शहापूर पोलीस ठाण्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर दारु अड्डा चालकास बागंडयाचा आहेर करून गावातून धिडं काढण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला. त्यामुळे या परीसरात वातावरण तणावपूर्ण बनले होते. घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे पो.नि. प्रकाश निकम, श्री यादव यांनी धाव घेत अड्डा चालकास ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी सरपंच सजंय चोपडे, उपसरपंच अश्विनी बुरसे, तटांमुक्त अध्यक्ष सांवता माने, श्री मुरतले यांचेसह या भागातील महिला व नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होत्या.