प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ राजहंस गल्ली परिसरात डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरात खोदाई सत्र सुरू असून याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. बसमार्गावर हे काम सुरू असल्याने बस ये-जा करतेवेळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तातडीने डेनेज वाहिन्या घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
अनगोळ परिसरातील डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. राजहंस गल्लीतून मारुती गल्लीपर्यंत डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. हा रस्ता बसमार्ग असून ये-जा करण्यासाठी वाहनधारक उपयोग करीत असतात. त्यामुळे राजहंस गल्लीमध्ये नेहमी वाहनांची वर्दळ असते. अलीकडे डेनेज वाहिन्यांसाठी खोदण्यात आलेली चर वाहनधारकांना अडचणीची ठरत आहे. अनगोळला येणारी बस लक्ष्मीमंदिरपर्यंत येते. त्यामुळे राजहंस गल्लीमध्ये बस येताच या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. सध्या वाहनधारकांना तसेच गल्लीतील रहिवाशांना डोकेदुखीचे बनले आहे.
या रस्त्यावर खोदण्यात आलेली चर लवकर बुजवून रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. याकडे लक्ष देऊन येथील समस्येचे निवारण करावे, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.