ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित जसराज यांचे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. भारत सरकारने सन 2000 मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले आहे.
पंडित जसराज शास्त्रीय संगीताच्या मेवती घराण्याशी संबंधित होते. वयाच्या 14 व्या वर्षी वडील पंडित मोतीराम यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतले. त्यानंतर वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पहिली मैफिल सादर केली. त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 1975 साली पद्म, 1990 साली पदमभूषण, 2000 साली पद्मविभूषण, 2013 साली भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पंडित जसराज यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय खगोल संघाने मंगळ आणि गुरु ग्रहांच्यामध्ये असलेल्या एका ग्रहाचे नाव पंडित जसराज ठेवले आहे. 2006 व्हीपी 32 (नंबर – 300128) असा हा ग्रह आहे.