सातारा / प्रतिनिधी
ख्रिसमस सण उद्या असल्याने सातारा शहरातील बाजारपेठेत ख्रिसमसच्या टोप्या, खेळणी, फटाके यासह साहित्य दाखल झाले आहे.मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने यावर्षी सण अतिशय साधेपणाने साजरा केला जाणार आहे.त्यामुळे विक्रेत्यांनी गुंतवणूक माल विक्री होईल की नाही याची भीती विक्रेत्यांना आहे.
ख्रिसमस सणाला दरवर्षी सातारा येथे ख्रिश्चन बांधवांसह इतर समाज बांधव ही सहभागी होत असतात.अतिशय उत्साही वातावरणात हा सण सहभागी होत असतो. बाजारात भेटवस्तूची रेलचेल होत असते.यावर्षी मात्र, कोरोना असल्याने सर्वच सण अतिशय साध्या पध्दतीने साजरे होत आहेत.तसाच हाही सण साजरा साधेपणाने होत आहे.