10 राज्यांमध्ये गर्दी जमवण्यास बंदी : मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये नाईट कर्फ्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गानंतर केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. केंद्राच्या इशाऱयानंतर राज्ये सतर्क झाली असून बहुतांश राज्यांनी आपली नवी नियमावली जारी केली आहे. आतापर्यंत 10 राज्यांनी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आधी निर्बंध जाहीर केले आहेत. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांनी नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तसेच दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओडिशामध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षारंभीच्या जल्लोषावर निर्बंध लादले आहेत.
ओमिक्रॉनचा धोका पाहता राज्ये पुन्हा सतर्कतेच्या मार्गावर आली आहेत. मध्यप्रदेशात 37 दिवसांनंतर पुन्हा कडक नियम लागू करण्यात आले. राज्यात गुरुवारपासून पुन्हा रात्रीची संचारबंदी लादण्यात आली. त्यानुसार रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत विनाकारण फिरणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिम, कोचिंग, थिएटर, सिनेमा हॉल, स्विमिंग पूलमध्ये लसीचे दोन्ही डोस घेणाऱया 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. गेहलोत सरकारनेही मार्गदर्शक तत्त्वांचा विचार सुरू केला असून नवे निर्बंध जारी केले. गुजरातमधील 8 शहरांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला. निर्बंध असलेल्या शहरांमध्ये अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, जामनगर, भावनगर, गांधीनगर आणि जुनागड यांचा समावेश आहे.
नोएडा-लखनौमध्ये कलम 144 लागू
उत्तर प्रदेशातही शुक्रवारी रात्रीच्या संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 25 डिसेंबरच्या रात्रीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्मयाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील नोएडा आणि लखनौमध्ये योगी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू केले आहे.
दिल्लीत सेलिब्रेशनला पूर्णविराम
दिल्लीमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सार्वजनिक उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत सर्व हॉटेल, बार किंवा रेस्टॉरंटमध्ये फक्त 50 टक्के आसनक्षमता असेल.
तेलंगणातील एका गावात 10 दिवसांचा लॉकडाऊन
तेलंगणात ओमिक्रॉनचे 38 रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले. राज्यातील गडेम नावाच्या गावात ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळल्यानंतर सर्वांच्या संमतीने 10 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या उत्सवाबाबत कोणतेही मोठे निर्बंध घातले नसले तरी दोन डोस घेतलेल्यांनाच हॉटेल आणि क्लबमध्ये प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच चेन्नईच्या समुद्र किनाऱयावर फक्त मर्यादित लोकच नवीन वर्ष साजरे करू शकतील.
कर्नाटक, ओडिशात नववर्ष साजरे करण्यावर बंदी
कर्नाटकात सलग दुसऱया वषी 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत नववर्ष साजरे करण्यास बंदी घालण्यात आली. ख्रिसमसच्या उत्सवावर कोणतीही बंदी नसली तरी चर्चमध्ये मोठय़ा प्रमाणात एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ओडिशातही नववर्षानिमित्त पाटर्य़ा आयोजित करण्यावर पूर्ण बंदी आहे. राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणांवर ही बंदी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी लागू होईल.