वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑनलाईनद्वारे सध्या सुरू असलेल्या ख्रिस्टीच्या लिलाव प्रक्रियेमध्ये भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांची कॅप तसेच प्रशिक्षक रवी शास्री यांचे प्रशिक्षण किटही विक्रीस ठेवण्यात आले आहे.
1971 च्या इंग्लंड दौऱयात भारतीय संघाने मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी या दौऱयात वापरलेल्या कॅपचा तसेच रवी शास्री यांची स्वाक्षरी असलेल्या प्रशिक्षण किटचा विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या स्मृतिचिन्हांत समावेश आहे. ख्रिस्टीच्या क्रिकेट क्षेत्रातील विविध अविस्मरणीय वस्तूंच्या लिलावामध्ये गावसकर यांनी आपली कॅप तसेच प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी प्रशिक्षण किट देणगी दाखल दिली आहे. 27 ऑक्टोबर रोजी सर जेफ्री बायकॉट कलेक्शन आणि टी-20 चॅरिटी क्रिकेटचे ऑनलाईनद्वारे झालेल्या लिलावाचे चित्रीकरण करण्यात आले होते. क्रिकेट क्षेत्रतील काही अविस्मरणीय प्रसिद्ध असलेल्या घटनामधील वस्तूंचा ख्रिस्टीच्या लिलावामध्ये समावेश आहे. 1981 साली हेडिंग्ले येथे झालेल्या ऍशेस कसोटीतील बोथमच्या शानदार कामगिरीचे तसेच 2019 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यातील काही अविस्मरणीय वस्तूंचा समावेश आहे. सर जेफ्री बायकॉट कलेक्शनमधील सुमारे 130 वस्तूंची विक्री झाली.
ख्रिस्टीच्या या क्लेशनमधील काही वस्तू क्रिकेट इतिहासातील अनमोल असल्याचे ख्रिस्टीचे अध्यक्ष ज्युसी पिलेकेनीन यांनी सांगितले. 1977 साली ऑगस्ट महिन्यात हेडिंग्लेच्या मैदानावर झालेल्या ऍशेस मालिकेतील कसोटीत दमदार फलंदाजी करत धावा जमविणाऱया बायकॉटच्या बॅटची विक्री करण्यात आली. या बॅटच्या विक्रीतून सुमारे 28.95-48.25 लाख रूपये मिळतील अशी अपेक्षा आहे. 1981 साली ब्रिजटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या बायकॉटला शून्यावर बाद करणारा विंडीजचा वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी वापरलेल्या शर्टचा यामध्ये समावेश आहे. भारतीय क्रिकेट शौकिन संपूर्ण जगभरात असून त्यांच्याकडून या लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.