वृत्त संस्था/ रोम
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऍटलांटाने मँचेस्टर युनायटेडला 2-2 असे गोल बरोबरीत रोखले. या सामन्यात मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळताना पोर्तुगालच्या रोनाल्डोने शेवटच्या काही मिनिटामध्ये दोन गोल करून आपल्या संघाला बरोबरी मिळवून दिली.
या सामन्यात ऍटलांटातर्फे जोसेफ इसिक आणि झॅपाटा यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीत रोनाल्डोने दोन गोल नोंदवून मँचेस्टर युनायटेडला पराभवापासून वाचविले. या स्पर्धेत फ गटात मँचेस्टर युनायटेडचा संघ 4 सामन्यांतून 7 गुणांसह पहिल्या स्थानावर असून ऍटलांटा तिसऱया स्थानावर आहे. या स्पर्धेतील अन्य सामन्यात बार्सिलोनाने डायनामो किव्हचा 1-0, बायर्न म्युनिचने बेनफिकाचा 5-0, ज्युवेंट्सने झेमिटचा 4-2, व्हिलारेलने यंग बॉईजचा 2-0 असा पराभव केला.