ओटवणे /प्रतिनिधी-
महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी चराठा माजी सरपंच विल्यम सालढाणा यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व्हीक्टर फर्नांडिस यांनी ही निवड केली आहे.
विल्यम सालढाणा कॅथलिक बँकेचे विद्यमान संचालक असून त्यांनी या बँकेचे व्हाईस चेअरमनपदही भूषविले आहे. तसेच विल्यम सालढाणा माजगाव विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. विल्यम सालढाणा यांच्या या निवडीबद्दल त्यांचे फादर मिलेक्स डिसोजा, फादर ॲलेक्स डिमेलो, फादर सुनील, कॅथलिक बँकेचे चेअरमन पी एफ डांटस आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.