प्रतिनिधी/ बेळगाव
येथील पास्टर्स ऍन्ड ख्रिस्टीन लिडर्स असोसिएशनच्यावतीने शनिवारी भारतीय ख्रिस्ती दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांना फळांचे वाटप करण्यात आले.
असोसिएशनचे अध्यक्ष पास्टर पी. थॉमस यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांना दूध, फळे, बिस्कीट व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. कोरोना संकटातून लवकरात लवकर बाहेर पडावेत, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी बोलताना पास्टर थॉमस म्हणाले, संपूर्ण देश कोरोनामुळे त्रस्त झाला आहे. कोरोनाचा नायनाट व्हावा अशी प्रार्थना करुन फळांचे वाटप करण्यात आले आहे.
ऍड. एन. आर. लातूर, पास्टर शंकर सवदत्ती, पास्टर सुधाकर, ऍड. रमेश व असोसिएशनचे नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. येशु ख्रिस्तांच्या बारा शिष्या wपैकी संत थॉमस केरळमधून भारतात आले. येशुचा संदेश पोहोचवत असताना त्यावेळचे मैलापूर व आताचे चेन्नईमध्ये त्यांची हत्या झाली. तेंव्हापासून 3 जुलै हा दिवस भारतीय ख्रिस्ती दिन म्हणून पाळला जातो.