चित्रपटाबद्दल अत्यंत उत्सुक अभिनेत्री
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ प्रदर्शित होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. याचदरम्यान प्रेक्षकांसाठी चकित करणारी माहिती समोर आली आहे. चित्रपटात अभिनेत्री हुमा कुरैशी देखील विशेष भूमिकेत दिसून येणार आहे.
चालू महिन्यात माझी वेबसीरिज मिथ्या प्रदर्शित होतेय. तर दुसरीकडे भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटात मी विशेष भूमिका साकारत असल्याने अत्यंत उत्सुक आहे. तसेच वलीमाई चित्रपटाबद्दलही मोठी उत्सुकता असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.
गंगूबाई काठियावाडीचा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला असून त्याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट अत्यंत वेगळय़ा प्रकारची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि विजय राज देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्रसिद्ध लेखक हुसैन झेदी यांचे पुस्तक माफिया क्वीनवर हा चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.