नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या शुक्रवारी गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव बदलावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. हा चित्रपट प्रसिद्ध होऊ देऊ नये, अशी मागणी करणाऱया अनेक याचिका अनेक न्यायालयांमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही सूचना केल्याचे समजते. यासंबंधीची सुनावणी आज गुरुवारीही सुरु राहणार आहे.
या चित्रपटातील कामाठीपुरा, चायना आणि काठियावाडी हे शब्द गाळण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली आहे, असेही समजते.