वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीरची कोरोना चाचणी घेण्यात आली, त्यात तो निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसापूर्वी गौतम गंभीरला कोरोनाची बाधा झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.
गौतम गंभीरची काही दिवसापूर्वी कोरोना चांचणी पहिल्यांदा करण्यात आली. त्यावेळी या चांचणीत पॉझिटिव्ह असल्याने गंभीरने स्वगृही आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता पण त्यानंतर गंभीरची दुसऱयांदा कोरोना चांचणी घेतली आणि तो निगेटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गंभीरने स्वत: ही माहिती आपल्या ट्विटरवर दिली आहे.