सातारा
सातारा जिह्यातून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग असे तब्बल पाच गुन्हे दाखल असलेला प्रमोद उर्फ बाळा काशिनाथ सकट(प्रतापसिंहनगर) याला सातारा जिह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आले आहे. सकट याच्या तडीपारीचा प्रस्ताव सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोर्लींस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्फत प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे पाठवला होता. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सकट यास सातारा जिह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आल्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पत्रकारांना दिली.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा व सामाजिक अशांतता निर्माण करणारा प्रतापसिंहनगर येथील प्रमोद उर्फ बाळा सकट याला तडीपार करण्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनीच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रस्ताव पाठवला होता. सकट याच्यावर पाच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याच्या तडीपारीच्या प्रस्तावाचा साताऱयाचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी विचार करुन लगेच त्यास मंजूरी दिली अन् दोन वर्षाकरता त्याला तडीपार केले. सातारा शहर पोलीस ठाण्याकडून आमिर इम्तियाज मुजावर(रा. पिरवाडी), आमिर सलिम शेख(रा. वनवासवाडी), प्रल्हाद रमेश पवार(रा. केसरकर पेठ), जीवन शहाजी रावते(दत्तनगर कोडोली), अभिजीत अशोक भिसे(रा. दत्तनगर कोडोली), विकास मुरलीधर मुळे(रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी), जगदीश रामेश्वर मते(रा. रांगोळे कॉलनी), सौरभ संजय जाधव(रा. मोळाचा ओढा), अभिजीत राजू भिसे(रा. मोळाचा ओढा), आकाश हणमंत पवार(रा. सैदापूर) यांनाही यापूर्वी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार गुंड दिसून आल्यास शहर पोलीस ठाण्यास नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यास परजिह्यात पोलिसांनी सोडले
सातारा शहर पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेवून परजिह्यात नेवून सोडण्याची कारवाई केली. ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाण्याचे डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलीस नाईक सुजित भोसले, गणेश ताटे, राजू कांबळे, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, पोलीस शिपाई विशाल धुमाळ, संतोष कचरे, सागर गायकवाड यांनी केली.