सातारा प्रतिनिधी
मार्चमध्ये कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सातारा जिल्हय़ात त्याची एवढी भीती नव्हती. तरीही जिल्हावासियांनी कडक लॉकडाऊन पाळत प्रशासनाला सहकार्य केले. मात्र अनलॉक प्रक्रियेनंतर जिल्हय़ात डब्लिंग रेट एवढा वाढला की मे ते जुलै कोरोनाने कहर सुरु केला व ऑगस्टमध्येही तो सुरुच आहे. बाधितांची एकूण संख्या 5 हजार 939 झाली असून ती सहा हजारांच्या उंबरठय़ावर उभी आहे. जिल्हय़ात मृत्यू दर करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु असताना गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून आजपर्यंत 192 जणांचे बळी गेले आहेत. बळींची वाढती संख्या चिंताजनक असून ती रोखण्यासाठी प्रशासनाला कंबर कसावी लागणार आहे. तर स्थानिक पातळीवर बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नसल्याने शहरात व्हेंटिलेटर अभावी झालेला हा सातवा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
दरम्यान, सोमवारी रात्रीच्या अहवालात 174 जणांचे अहवाल बाधित आले असून यामध्ये कराड 69, सातारा 25, खंडाळा 19 असे बाधित इतर तालुक्यांमध्ये देखील कमी संख्येने पण बाधित आहेतच. मंगळवारी रात्रीच्या अहवालात … एवढे बाधित समोर आले आहेत. तर जिल्हय़ातील 53 नागरिकांनी कोरोनावर मात केलेली आहे.
12 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू
जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे काले ता. कराड येथील 30 वर्षीय महिला, पाटण येथील 54 वर्षीय पुरुष, सांगुर ता. पाटण येथील 40 वर्षीय पुरुष, चोरे ता. कराड 57 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा 73 वर्षीय पुरुष, वडगाव ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, सोनापूर ता. सातारा 92 वर्षीय महिला, सोमवार पेठ फलटण 56 वर्षीय पुरुष व फलटण येथील 70 वर्षीय महिला या सात कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर साताऱयात खाजगी हॉस्पिटल येथे व्यंकटपुरा पेठ सातारा 48 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा 74 वर्षीय पुरुषाचा शनिवार पेठ कराड 68 वर्षीय कोरोना बाधित महिलेसह एकूण 12 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिल्ली आहे.
जिह्यातील 53 जणांची कोरोना वर मात
डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये कराड तालुक्यातील 27, खंडाळा तालुक्यातील 1, खटाव तालुक्यातील 1, महाबळेश्वर तालुक्यातील 1, कोरेगाव तालुक्यातील 1, सातारा तालुक्यातील 10, माण तालुक्यातील 1, पाटण तालुक्यातील 6, वाई तालुक्यातील 5 असे एकूण 53 नागरिकांचा समावेश आहे.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे सप्तशतक
कृष्णा हॉस्पिटलमधून 34 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला यामुळे आतापर्यंत तालुक्यात एकूण 704 जण कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी कोरोनामुक्तांमध्ये नेराळे-पाटण 59 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड 42 वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक 54 वर्षीय महिला, 24 वर्षीय युवती, 34 वर्षीय महिला, पाटण 20 वर्षीय युवती, वडोलानिळेश्वर 48 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर 41 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, धावरवाडी 33 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, कार्वे 65 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय पुरूष, शनिवार पेठ कराड 76 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, वाठाराकिरोली 30 वर्षीय पुरूष, कोयना वसाहत 35 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी, 7 वर्षीय मुलगी, 37 वर्षीय पुरुष, वाठार 35 वर्षीय पुरुष, येडेमच्छिंद्र 31 वर्षीय पुरुष, नारायणवाडी 35 वर्षीय पुरूष, शुक्रवार पेठ कराड 70 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय महिला, मलकापूर 36 वर्षीय महिला, शेरे 48 वर्षीय महिला, कार्वेनाका 39 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, भिलार महाबळेश्वर 68 वर्षीय पुरूष, कालवडे 21 वर्षीय युवक, नागठाणे 18 वर्षीय युवती यांचा समावेश आहे.
कराड व सातारा हॉटस्पॉट चिंताजनक
यामध्ये कराड 1403, सातारा 1033 हे हॉटस्पॉट ठरलेले असून त्यापाठोपाठ वाई 630, जावली 471, खंडाळा 464, फलटण 388, कोरेगाव 373, पाटण 355, खटाव 266, महाबळेश्वर 149 व माणमध्ये 130 जण बाधित होते. यापैकी 2 हजार 753 जणांनी कोरोनावर मात केलेली असून 2 हजार 999 एवढे रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होत असले तरी त्याचा बाधित संख्येपेक्षा त्याचा वेग कमी असून दुसरीकडे बळींची संख्या वाढत असल्याने प्रशासनाला उपाय योजना वाढवाव्या लागणार आहेत. संसर्ग साखळया निर्माणच होवू नयेत यासाठी नागरिकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे.
अगोदर निगेटिव्ह, नंतर पॉझिटिव्ह
काले येथे दोन दिवस रुग्ण न सापडले नसल्याने दिलासा मिळाला होता. मात्र दोन दिवसापूर्वी येथील तीस वर्षीय महिलेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली तेव्हा ही टेस्ट निगेटिव्ह आली मात्र धाप लागण्याचा त्रास कमी होत नव्हता. त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना ऑक्सिजन कमी झाल्याने या 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण न समजल्याने नाही त्यांचे आणखी काही नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पुढील तपासण्यासाठी पाठवण्यात आले मात्र पुण्याहून महिलेच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या कुटुंबासह पूर्ण कालेकरांना धक्का बसला.
कराडमध्ये निवृत्त नायब तहसीलदाराचा मृत्यू
कराडमधील शनिवार पेठेतील सेवानिवृत्त नायब तहसीलदाराचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रविवारी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने येथील कोविड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र त्यांना बेड आणि व्हेंटिलेटर मिळाला नाही. त्यामुळे सातारा येथे खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र यात बराच वेळ गेला. त्यामुळे स्थानिक पातळीवर बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नसल्याने शहरात व्हेंटिलेटर अभावी झालेला हा सातवा मृत्यू आहे.
मिठाई उत्पादन, विक्री व वाटपास मनाई
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्वत्र मिठाईचे खास करुन जिलेबीचे वाटप केले जाते. मात्र, जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येवून मोठय़ा प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होवून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी जिल्हाधिकाऱयांनी जिह्यामध्ये कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री, वाटप करण्यास मनाई केली आहे.
663 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 54, कराड 12, कोरेगाव 17, वाई 63, शिरवळ येथील 88, रायगाव 6, पानमळेवाडी 130, मायणी 60, महाबळेश्वर येथील 70, पाटण 17, खावली 39, ढेबेवाडी 17 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 90 असे एकूण 663 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.