इस्रो अध्यक्षांनी दिली माहिती
वृत्तसंस्था / चेन्नई
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) स्वतःच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी ग्रीन प्रोपल्सन तयार करत आहे. गगनयान अंतर्गत भारत मानवी अंतराळ मोहीम साकारणार आहे. ग्रीन प्रोपल्सनद्वारे भारत प्रदूषणमुक्त प्रक्षेपणाचा प्रयत्न करणार आहे. मोहिमेत प्रक्षेपकाच्या सर्व टप्प्यांचा वापर केला जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली आहे. एआरएम इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 16 व्या दीक्षांत सोहळय़ात ते बोलत होते.
स्वतःच्या जीवनात आकलनबद्ध जोखीम पत्करल्यास पूर्णपणे अपयशी होण्यापासून बचाव होऊ शकेल असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. भारतात आर्थिक विकासाचा वेग गतिमान होत आहे. वाढत्या आर्थिक कार्यांदरम्यान प्रदूषणमुक्त हरित तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. इस्रोने प्रदूषणमुक्त लीथियम आयर्न बॅटरी तयार केली असून ती इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरासाठी उपयुक्त आहे. पर्यावरणीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इस्रो स्वतःच्या गगनयान मोहिमेत ग्रीन प्रोपल्सनची तयारी करत आहे. याकरता प्रदूषणमुक्त प्रक्षेपक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. भविष्यातील उपग्रह प्रक्षेपणात ग्रीन प्रोपल्सनच्या वापराची योजना असल्याचे सिवन म्हणाले.
पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल हे उपग्रहाला अंतराळात पाठविण्याचे वैज्ञानिकांचे विश्वासार्ह माध्यम आहे. यात चारस्तरीय इंधनाने भरलेला प्रक्षेपक असतो. तर दुसरे जियो स्टेशनरी लाँच व्हेईकल असते आणि यात तीनस्तरीय प्रक्षेपक असतो.