वृत्तसंस्था/ पुणे
लंडन ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीत कांस्यपदक मिळविणारा भारताचा नेमबाज गगन नारंग तसेच राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळणारी महिला नेमबाज अनु राज सिंग हे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. चालू माहिन्याच्या अखेरीस गगन नारंग आणि अनु राज सिंग यांचा विवाह हैद्राबादमध्ये होणार आहे.
गेल्या तब्बल दोन दशकांच्या कालावधीत भारतीय नेमबाज संघामध्ये सातत्याने आपला सहभाग दर्शविताना गगन नारंग आणि अनु राज सिंग यांच्यातील मैत्रीच्या संबंधांचे रूपांतर आता विवाहात होणार आहे. महिला नेमबाज अनु राज सिंग अर्जुन पुरस्कार विजेती आहे. नारंग आणि अनु राज सिंग यांनी ऑलिंपिकसह अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.