31 वर्षांपासून मूर्ती जमवित आहेत डॉक्टर, 2006 मध्ये गिनीज बुकमध्ये नाव नोंद
हरियाणाच्या जींदमधील एका व्यक्तीला विघ्नहर्ता भगवान गणेश यांच्या विविध प्रकारच्या मूर्तींचा संग्रह करण्याचा छंद आहे. डॉ. विवेक सिंगला यांच्याकडील संग्रहात प्रत्येक मूर्तीचे स्वरुप इतरांपेक्षा खूपच वेगळे आहे. याच छंदापोटी डॉक्टर सिंगला यांच्याकडे 3106 गणेश स्वरुपांचा संग्रह आहे. त्यांचे नाव 2006 साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्येही नेंद झाले आहे.
34 वर्षांपूर्वी ते मुंबईत आले होते, तेथे गणेश विसर्जनादरम्यान त्यांनी अनेक प्रकारच्या मूर्ती पाहिल्या होत्या. तेव्हापासूनच त्यांना मूर्तींचा संग्रह करण्याचा छंद जडला. यानंतर ते कुठेही गेले तरीही गणेश मूर्ती शोधत राहिले. त्यांच्याकडे अष्टधातूपासून मार्बब, लाकडी, माती, पीओपीपासून सर्वप्रकारच्या मूर्ती आहेत. या मूर्तींना त्यांनी स्वतःच्या क्लीनिकमधील वेगळय़ा कक्षात सजवून ठेवले आहे. यातील काही मूर्ती दोन इंचाच्या तर तर काही दोन फुटांच्या देखील आहेत.
देशविदेशातून संग्रह
देशाच्या प्रत्येक कानाकोपऱयातून त्यांनी भगवान गणेशाच्या मूर्ती आणल्या आहेत. सुमारे 400 मूर्ती त्यांनीच तयार केल्या आहेत. तसेच विदेशात गेल्यावर तेथूनही त्यांनी गजाननाची मूर्ती आणली आहे. त्यांच्याकडे थायलंड, इटली, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, फिलिपाईन्स येथून आणलेल्या मूर्ती देखील आहेत.
अनोख्या मूर्ती
सिंगला यांच्या संग्रहात काही मूर्ती भगवान गणेश मोबाइल वापरत असल्याचे दर्शविणाऱया आहेत. तर काही बुलेटवर स्वार आहेत. डाळींनी तयार केलेला गणेश सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तर रुग्णावर उपचार करणारा, झोपाळय़ावर झुलणारा, सायकल चालविणारा, पुस्तके वाचून दाखविणारा, नौकेत बसलेला, गरबा नृत्य करणारा, हार्मोनियन वाजविणारा गणेश देखील त्यांच्याकडे आहे.