फोर्ट रोडवरील जिजामाता चौक येथील बसथांब्यानजीकची अवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील हॉटेल, हॉस्पिटल, कारखाने यासह घरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार व नाल्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गटारीतून सांडपाणी वाहते खरे, मात्र गटारीचे बांधकाम काही ठिकाणी अर्धवट असल्यामुळे सांडपाणी एकाच ठिकाणी साचून राहते. ही परिस्थिती फोर्ट रोडवरील जिजामाता चौक येथील बसथांब्याच्या मागील बाजूस निदर्शनास आली.
बसथांब्याच्या मागील बाजूस सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या गटारीची पुढील बाजू बंद करण्यात आल्यामुळे सांडपाणी साचून राहिले आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असून डासांचा प्रादुर्भावदेखील मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.
या गटारीच्या बाजूच्या परिसरात शाळा महाविद्यालये आहेत. काही विद्यार्थी घरी जाण्यासाठी येथील बसस्थानकावर बसची वाट पाहत असतात.
त्यामुळे या ठिकाणी वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे अनेक रोग उद्भवण्याची शक्मयता असून विद्यार्थ्यांचे आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेले गटारीचे अर्धवट काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.