बिअर बार, दारुची दुकाने आतल्या बाजूने सुरु
प्रतिनिधी/ सातारा
आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस रविवारी आहे. शनिवारी सातारा जिह्यात विकेंड लॉकडाऊन उधळला असून शनिवारी जिह्यात दारुची दुप्पट, चौपट दराने विक्री होत होती. सातारा जिह्यात दारुची दुकाने, बिअर बार हे बाहेरुन शटर डाऊन दिसत होते परंतु आतल्या बाजूने जोमाने विक्री सुरु होती. सातारा पोलीस दलाने गेल्या आठ दिवसांपासून जिह्यातील चोरटय़ा दारु विक्री करणाऱयांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. तर राज्य उत्पादन शुल्कचे राज्यमंत्र्यांच्या जिह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला एकही दारु विक्री करणारे दुकान वा दारु विक्रेता सापडला नाही. मात्र जिल्हातील विविध ठिकाणी गटारी साजरी करण्यासाठी मोठय़ा गर्दी होत असून विकेंड लॉकडाऊनच्या नियमांना तिलांजली वाहील्याचे दिसून येत आहे.
जिह्यात शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन आहे. यामध्ये सर्वच दारुची दारुची दुकानेही बंद आहेत. परंतु गटारी असल्याने आणि आषाढ महिन्याचा शेवटचे दोन दिवस उरल्याने अनेकांनी दारुची खरेदी केली. दुकाने बंद असल्याने दारु विक्रेत्यांनी दुप्पट, तिप्पट दराने दारुची विक्री होत होती. विकेंड लॉकडाऊनच्या दिवशी दारुच्या दुकानाचे पुढचे दार बंद तर मागच्या दाराने दारुची बाटली मिळत होती. तीही दुप्पट दराने. यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई होत नव्हती. राज्याचे राज्य उत्पादनशुल्क मंत्री सातारा जिह्याचे आहेत. शंभूराज देसाई हे मंत्री असूनही त्यांच्याच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही ठोस अवैध दारु विक्री किंवा लॉकडाऊनच्या दिवशी दारु विक्री करणाऱया दुकानावर नेमकी कारवाई झाल्याचे कुठेही दिसत नाही.
सातारा पोलीस दलाकडून कारवाईचा धडाका
सातारा पोलीस दलाचे अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पोलीस दलाला दिल्या गेलेल्या सुचनेनुसार जिह्यात गेल्या आठवडय़ापासून जिह्यात अनेक ठिकाणी कारवाया जोरदारपणे सुरु आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोज किमान एकावर कारवाई करुन त्याच्यावर सीआरपीसी 41 नुसार कारवाई केली जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क जागे होणार केव्हा?
साताऱयाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडाकेबाज कारवाया आता दिसत नाही. त्यामुळे जिह्यात चोरटय़ा पद्धतीने दारु विक्री करणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने संपवले की काय?, कारवायाच होत नसल्याने नेमके राज्य उत्पादन शुल्क विभाग जागा आहे की नाही अशीही चर्चा सुरु आहे.