पर्यटन स्थळी पार्टी जोमात
प्रतिनिधी/ सातारा
साप्ताहिक सुट्टी आणि गटारी आमावस्या रविवारी आल्याने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. चिकन-मटण, मासे यांची मागणी वाढल्याने दरही तेजीत होते. घराघरात मासांहारी जेवणाचा आस्वाद घेण्यात आला. तर पर्यटन स्थळी बंदी असताना तरूणाईच्या पार्टीचा उत्साह कायम होता. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आज दि. 9 रोजी सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे.
सातारा शहरात सकाळपासून निर्मल हॉल जवळील, कासट मार्केट, खंडोबा माळ रस्ता, सातारा नगरपालिका जवळ, सदरबाझार, व इतर भागात असणाऱया चिकन-मटणच्या दुकानात सकाळी 7 वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असला तरी मास्क लावून यांची खरेदी करण्यात आली. मागणी वाढल्याने विक्रेते सुखावले होते. चिकन 200 ते 220 रूपये किलो, मटण 650 ते 700 रूपये किलो दराने विक्री सूरू होती. तसेच सुरमाई 260 रूपये किलो, वॉम 270 रूपये, पापलेट 430 रूपये किलो दराने विकण्यात आले. घग्नराघरात मासांहारी जेवणाचा आस्वाद घेण्यात आला. हॉटेल 50 क्षमेतेने सुरू असल्याने अनेकांनी दादज् बिर्याणी हॉऊस, हॉटेल जगदँब, मानस हॉटेल, कणसे ढाबा, बालाजी ढाबा, जलसागर ढाबा व इतर हॉटेलमध्ये जावून बिर्याणी, मटण-चिकन हंडी, बटर चिकन अशा अनेक पदार्थाचा आस्वाद घ्यायला गर्दी केली होती. यामुळे हॉटेल व्यवसायिकांना आखाडीच्या शेवटच्या दिवशी चांगला फायदा झाला. कोरोनामुळे पर्यटनस्थळी जाण्यास बंदी आहे. परंतु हा नियम मोडत अनेकांनी कास, ठोसेघर, उरमोडी, परळी खोरे, यवतेश्वर, बामणोली येथे पार्टीचा बेत आखला होता. या पर्यटन स्थळी तरूणाईचा जल्लोष दिवसभर सूरू होता. मासांहारी जेवणाला दारूची जोड मिळाली होती. रात्री उशीरापर्यंत दारूच्या दुकानात दारूची खरेदी सुरू होती. सकाळपासून शहरात पोलीसांनी वॉच होता. पर्यटन स्थळी येणाऱया वाहनांची तपासणी सुरू होती.