कोरची तालुक्यात चकमक, तीन जवान जखमी
प्रतिनिधी/ नागपूर ः
नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले. पोलिस -नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलिस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्हयातील कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस ठाण्यांतर्गत बोटेझरी जंगल परिसरात शनिवारी पहाटे मोठी चकमक झाली.
नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्हयात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल सहा नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस -नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हेलिकॉप्टरने sहलविण्यात आले. शनिवारी (13 नोव्हेंबर) सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठय़ा संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली.
या नक्षलवाद्यांनी छत्तीसगड भागातून गडचिरोली जिह्या प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सी -60 पथकाचे जवान छत्तीसगड सीमावर्ती भागातील बोटेझरी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. पहाटे साडेपाच वाजता पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. पथकानेही त्यांना जोरदार प्रत्युतर दिले. त्यानंतर नक्षलवादी घटनास्थळावरुन पसार झाले.