एक लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त
उचगाव / वार्ताहर
गडमुडशिंगी( ता. करवीर) येथे पशुखाद्य कारखाना रस्त्यालगत ऊस पिकाच्या शेता जवळ तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळत असताना गांधीनगर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम २९४००, मोबाईल हँडसेट व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण १लाख २९,४०० रुपयांचा माल हस्तगत केला.ही कारवाई रविवारी रात्री आठच्या दरम्यान झाली.
कुंदन मारुती नागावे वय ३६ रा. मोरे गल्ली ,विशाल गुंडा शिरगावे वय २९ रा. गोसावी गल्ली ,आतिष आनंदराव शिरगावे वय ३२ रा. शिवाजी चौक, राहुल राजाराम गवळी वय ३१ रा. गोकुळ चौक ,सागर प्रकाश शिंदे वय २९रा. गौरीशंकर नगर गडमुडशिंगी तालुका करवीर यांच्यावर गांधीनगर पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी हे पाच जण बेकायदेशीररित्या शासनाने घालून दिलेल्या कोविड १९ नियमात न राहता सोशल डिसटन्स न ठेवता,मास्क न घालता तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळत असताना पोलिसांना आढळून आले.
त्यांच्याकडील रोख रक्कम २९४०० रुपये व पाच मोबाईल हँडसेट व इतर जुगार साहित्य असे एकूण एक लाख २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला .याबाबत गांधीनगर पोलिसात पोलीस नाईक आकाश संभाजी पाटील यांनी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस हवालदार मोहन गवळी करीत आहेत.