रोहीत ताशिलदार / गडहिंग्लज
राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायती कर आकारणे, विविध बांधकाम परवाना, अतिक्रमण निर्मुलन, गावच्या विकासासाठी ध्येय धोरण ठरवणे आणि गावातील मालकी हक्काचे वाद कमी करण्याच्या प्रमूख हेतुने भुमिअभिलेखच्या माध्यातूने गडहिंग्लज तालुक्यातील 25 गावांची हद्द `ड्रोन’ सर्व्हे करून गावठाण हद्द निश्चित करण्यात आली आहे. 39 गावाची हद्द पुर्वीपासून निश्चिती असून उर्व†िरत गावांची हद्दी मोजणी काम अंतिम टप्प्यात आहे.
राज्यातील ग्रामपंचातीची हद्द निश्चित करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाकडून `सर्व्हे ऑफ इंडिया’ च्या मदतीने ड्रोनव्दारे गावच्या सीमाचे सर्व्हे करण्यात येत आहे. पारंपारिक मोजणी पध्दतीपेक्षा कमी वेळेत आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने कामात पारदर्शकता येणार आहे. तर `3ड्री’ छायाचित्र प्राप्त झाल्यानंतर विविध विकास यंत्रणा आणि विभागाला नियोजन करण्यासाठी सोपे ठरणार आहे.
यामुळे गावातील ग्रामस्थांना जागेचा किंवा मिळकतीचा नकाशा तयार आणि सीमा निश्चित होवून नेमके क्षेत्राची माहिती मिळणार आहे. जागेची मिळकत पत्रिकेस सात-बारा प्रमाणेच मालकी हक्काचा पुरावा म्हणून फायदेशीरदृष्या मान्यता दिला जाणार आहे. बांधकाम परवानगीसाठी मिळकत पत्रिका आवश्यक मानले जाणार आहे. मिळकतीचे संरक्षण करता येणार असून गावठाण हद्दीतील मालकीचे वाद संपुष्टात आणण्यास भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल.
गावठाण हद्द निश्चित झालेली गावे – जख्खेवाडी, बेकनाळ, खमलेट्टी, तनवडी, चंदनकुड, येणेचवंडी, नौकुड, मनवाड, नंदनवाड, कडाल, वैरागवाडी, हिडदुग्गी, तेगीनहाळ, मुंगूरवाडी, दुगूणवाडी, जांभूळवाडी, मासेवाडी, लिंगनूर तर्फ नेसरी, हेब्बाळ-जलद्याळ, तावरेवाडी, काळमावाडी, येमेहट्टी, हसुरवाडी, तुपूरवाडी गावाचा समावेश आहे. |