गडहिंग्लज / प्रतिनिधी
गडहिंग्लज विभागाचे डीवायएसपी अंगद जाधवर यांची बदली झाल्याने गेल्या काही दिवसापासून करवीरचे डीवायएसपी प्रशांत अमृतकर यांच्याकडे गडहिंग्लज विभागाचा प्रभारी कार्यभार होता. राज्यातील डीवायएसपी अधिका-यांच्या बदलीचे आदेश निघाले असून गडहिंग्लज विभागाच्या डीवायएसपी पदावर गणेश इंगळे याची नियुक्ती झाली आहे. श्री. इंगळे सध्या रत्नागिरी येथे डीवायएसपी पदावर कार्यरत होते.