बेळगाव/ प्रतिनिधी
गणाचारी गल्ली येथील श्री गणेश जयंती उत्सव मंडळ, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जी. जी. बॉईज, श्री रेणुकादेवी महिला मंडळ, बाल शिवराय युवक मंडळा यांच्या संयुक्त सहकार्याने गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी पोवाड गायन कार्यक्रम देखील पार पडला. या निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 7 वा. महाप्रसादाला पारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.