दोघे जखमी : जखमीत बाप मुलाचा समावेश
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर-बेळगाव रस्त्यावर गणेबैलनजिक कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस व स्कॉर्पियोची समोरासमोर जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 4 च्या दरम्यान घडली. अपघतात ठार झालेल्याचे नाव निवास भिकाजी सावंत (वय 45) मूळ रा. कराड, सध्या रा, गणेशपूर बेळगाव असे आहे. जखमी झालेल्याचे नाव प्रकाश पाटील (वय 48) रा. तोराळी ता. खानापूर व राहूल प्रकाश पाटील रा. तोराळी खानापूर असे आहे.
या अपघाताची हकीकत अशी, प्रकाश पाटील हे आपले मित्र निवास सावंत व मुलगा राहूल यांच्यासह खानापूर येथे आपले काम आटोपून स्कॉर्पियोमधून बेळगावकडे जात असताना गणेबैलनजिक बेळगाव खानापूर बसशी स्कॉर्पिओची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये स्कॉर्पिओ व बस अपघाताच्या ठिकाणहून 15 ते 20 फुट दुर फेकल्या गेल्या. या ठिकाणी जवळपास 2 फूट खोल जागेत दोन्ही गाडय़ा जाऊन थांबल्या. त्यामध्sय बेळगावकडे जाणाऱया स्कॉर्पिओचे तोंड खानापूरच्या दिशेने वळल. अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओची बरीच मोडतोड झाली आहे. निवास हे स्कॉर्पिओ चालवत होते. हे त्या स्कार्पिओमध्ये अडकून पडले होते. अपघताचे वृत्त समजताच लोक धाऊन आले. 15 ते 20 मिनिटे अथक प्रयत्नातून स्कॉर्पिओमध्ये अडकलेल्या निवास यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. ते गंभरी जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले. पण उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. स्कॉर्पिओचे मालक प्रकाश पाटील व त्यांच्या मुलगा राहूल हे दोघेही नशीबानेच बचावले आहेत. प्रकाश पाटील यांनाही उपचारासाठी बेळगावच्या हॉस्पिटलमध्येच दाखल केले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. राहूल हाही किरकोळ जखमी झाला आहे. स्कॉर्पिओ मात्र पूर्णत: निकामी झाली आहे. बसच्या समोरील भागही पूर्णपणे चेपला गेला आहे. बसमधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताचे वृत्त समजताच खानापुरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंत्रे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.