वार्ताहर/ नंदगड
गणेबैल येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित गणेबैल हायस्कूलला गणेबैल गावातील नूतन ग्रा. पं. सदस्य जोतिबा गुरव, महादेव गुरव, सदस्या ज्योती मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व आरोग्याच्यादृष्टीने थर्मल स्क्रिनिंग, मास्क व सॅनिटायझर भेट म्हणून दिली.
हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एम. येळ्ळूरकर यांनी सदर साहित्य स्वीकारले. व हायस्कूलच्यावतीने नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार केला. यावेळी माजी ग्रा. पं. सदस्य राजाराम गुरव, एसडीएमसी अध्यक्ष भैरु गुरव, सातेरी मजगावकर, लक्ष्मण गुरव, आप्पाणा गुरव, यशवंत गुरव, संजू गुरव, सिद्धनाथ तोपिनकट्टीकर व गावातील मान्यवर तसेच एसडीएमसीचे सदस्य उपस्थित होते.