प्रतिनिधी /सातारा :
अवघ्या एक दिवसांनी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील खरेदी अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्स नियमांचे उल्लघंन होवू नये म्हणून गुरूवारी 5 वाजेपर्यंत गणेश मूर्ती घरी नेण्याची परवानगी होती. तसेच सजावट, पुजेचे साहित्य यांच्या खरेदी सुरू होती. आज दि. 21 रोजी घराघरात हरतालिका पुजन करण्यात येत आहे.
कोरोनाची गडद छाया पसरल्याने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरी करण्यावर भर दिला जात आहे. गणेश मंडळांनी मूर्ती न बसवताना सामाजिक उपक्रम राबवण्याचे नियोजन केले आहे. मात्र, घराघरात उत्सवाची तयारी सुरू आहे. गुरूवारी सकाळपासून बाजारपेठेत गर्दी दिसत होती. पावसाची संततधार सुरू असतानाही बाजारपेठ गजबजली होती. प्लॉस्टर ऑफ परिसच्या मूर्तीसह शाडुच्या मूर्तीचे बुकिंग झाले. सजावटीच्या साहित्यांनी घरे उजळून निघाली आहेत. गौरीसाठी साडी, दागिने, मुखवटे, स्टॅड, ओटी, तसेच गणरायासाठी वस्त्र, मोत्यांच्या माळा, मुकुंट ची खरेदी झाली. रंगोळीचे विविध रंग, पुजेचे साहित्य खरेदी करण्यात आले.