भजन, आरत्या, फुगडय़ा घरगुती स्वरुपातच : गणेश पूजन शक्यतो स्वतःच करावे : घरोघरी फिरणे टाळावे!
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
या वषीचा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. गणेशोत्सव साध्या पद्धतीने व कमीत-कमी दिवसात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी भजन, आरत्या, फुगडय़ा घरगुती स्वरुपात कराव्यात, मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दरवषी मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु यावषी कोरोनाचं सावट असल्याने जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या गेल्या आहेत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हय़ात येण्यासाठी एस. टी. ने प्रवास करणाऱयांसाठी वेगळय़ा ई-पासची गरज भासणार नाही. इतर खासगी वाहनांनी प्रवास करणाऱयांना ई-पास सक्तीचा असणार आहे. सदर पास covid??.mahapolice.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 12 ऑगस्टपर्यंत गणेशोत्सवासाठी येणाऱया नागरिकांना दहा दिवस गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यासाठी नागरिकांना कोणत्याही कोविड-19 च्या तपासणीची आवश्यकता नाही. 12 ऑगस्ट 2020 नंतर जे नागरिक जिल्हय़ात प्रवेश करणार आहेत, त्यांना किमान 48 तास आधी कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे गरजेचे आहे. तसेच या व्यक्तींनी तीन दिवस घराबाहेर पडू नये, स्थानिक आरोग्य विभागाने त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याची खात्री करावी. जिल्हय़ात प्रवेश करणाऱया नागरिकांची नाक्मयावरच तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने पुरेशा प्रमाणात पल्स ऑक्सीमीटर, थर्मल स्कॅनर, रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट किट तपासणी नाक्मयावर उपलब्ध करून द्यावे. आजाराची लक्षणे असणाऱया व्यक्ती, दुर्धर आजार असणाऱया व्यक्ती यांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी तालुका पातळीवरील संबंधित गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांच्या बैठका घ्याव्यात. सदर बैठकीस गाव, वॉर्ड नियंत्रण समितीच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करावे. गणेशोत्सव कालावधीत पार पाडायच्या जबाबदाऱया तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याबाबतचे नियोजन करावे व संबंधितांना याबाबत अवगत करावे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोवीड केअर सेंटरची क्षमता वाढवावी. सर्व तहसीलदारांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करावी. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी संबंधित तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडून परवनागी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकरिता गणेश मूर्तीची उंची चार फूट, तर घरगुती गणपतीकरिता मूर्ती दोन फुटांची असेल. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेल्या आदेश आणि संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावषीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजपणा नसावा. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश दर्शनासाठी गर्दी होणार नाही. तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक, शारीरिक अंतराचे, स्वच्छतेचे नियम त्यात मास्क, सॅनिटायझर वापरणे पाळतात याची खात्री मंडळाचे अध्यक्षांनी करावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात यावी. श्री गणेश दर्शन सुविधा ऑनलाईन, केबल, वेबसाईट, फेसबूक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडळास भेट देणाऱया व्यक्तींची नोद ठेवावी. जेणेकरून बाधित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट टेसिंग करणे सोपे होईल. उत्सव कालावधीत गणेश मंडळाबाहेर हार, नारळ, मिठाई दुकाने लावण्यात येऊ नयेत. यंदा गणेशोत्सव कमीत कमी दिवसांचा साजरा करावा. घरगुती गणपतीची पूजा शक्मयतो स्वतःच करावी. पुरोहितांनी जास्तीत जास्त ऑनलाईन (व्हीडिओ ऍप्स) तंत्रज्ञानाचा वापर करावा. गणेशोत्सव कालावधीत भजन, आरती, फुगडी, कीर्तन, गौरी वसा असे कार्यक्रम घरगुती स्वरुपात कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करावेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरोघरी फिरून भेटी देणे टाळावे. विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले, ज्ये÷ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, वाडीतील, गावातील, इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितपणे काढण्यात येऊ नये. शक्मयतो घराजवळच्याच विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनावेळी कोवीड-19 बाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. याबाबत गाव समिती, प्रभाग समिती यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात खबरदारी घ्यावी.
कंटेनमेंट झोनमध्ये उपविभागीय अधिकाऱयांचे आदेश लागू
उपरोक्त आदेश कंटेनमेंट झोनमध्ये लागू राहणार नाहीत. सदर कंटेनमेंट झोनमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी लागू केलेले प्रतिबंध लागू असणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत. कोरोना संकट रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे तसेच यापूर्वी जसे ग्राम नियंत्रण समित्या व प्रभाग समित्यांनी सहकार्य केले, तसेच यावेळीही सहकार्य करून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.