बाप्पांच्या स्वागतासाठी विविध साहित्याची खरेदी : सर्वत्र उत्साही वातावरण : गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी
प्रतिनिधी /बेळगाव
विघ्नहर्त्या गणरायांचे बुधवारी आगमन होत असून, उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपल्याने रविवारी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली. संपूर्ण आठवडाभर बाजारपेठेत कायम गर्दी दिसत असून, रविवारी गर्दीने उच्चांक गाठला. उत्साहाने खरेदी करणाऱया गणेश भक्तांमुळे विपेते व व्यापारी आनंदित झाले आहेत. शहरात सर्वत्र उत्साही वातावरण होते. गर्दीमुळे अर्थातच ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी मात्र होत आहे.
रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधून नागरिक खरेदीसाठी सकाळीच बाहेर पडले. अर्थातच बालचमूही त्यांच्या सोबत होता. रात्री उशीरापर्यंत गर्दीचा ओघ कायम सुरू होता.लाडक्मया बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहात आहे. याबरोबर स्वागताची तयारी करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटानंतर गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भक्तांबरोबर बाजारपेठही विविध साहित्यांनी सजली आहे. वेशेषतः बाजारात पूजेचे, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाईचे साहित्य याबरोबर कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.
विशेषतः गणेशोत्सवात नवीन साहित्य खरेदी केले जाते. त्यामुळे सोन्या-चांदीच्या पेढय़ा, इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
गणरायाच्या पूजेसाठी विविध फळे, अगरबत्ती, कापूर, पूजेचे पाट, अबिर गुलाल, नाडापुडी आणि इतर साहित्याची मागणी वाढली आहे. तर बालचमूंसाठी बंदूक, फटाके आणि इतर साहित्यही पाहायला मिळत आहे. बापट गल्लीत विद्युत रोषणाईच्या माळा, पाईप माळ, एलईडी बल्ब, एलईडी चक्र, दीपमाळ आदी विद्युत रोषणाईच्या साहित्याची खरेदी होताना दिसत आहे.
गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजारात गर्दीच गर्दी
शनिवारी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिक बाजारात दाखल झाले होते. मात्र, दुपारनंतर अचानक जोरदार पाऊस आल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. पावसामुळे काही नागरिकांना माघारी परतावे लागले होते. त्यामुळे बाजारात नागरिकही तुरळक प्रमाणात दिसून आले. मात्र, रविवारी पावसाने उसंत दिल्याने सकाळपासूनच बाजारपेठत ग्राहकांची गर्दी होती. दुपारनंतर बाजारात गर्दी वाढत गेली. विशेषतः गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, मेणसे गल्ली, बापट गल्ली, कडोलकर गल्ली, काकतीवेस आदी भाग लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
मोदकाच्या मागणी वाढ
सजावटीच्या साहित्यामध्ये विविध रंगाचे कागदी ताव, तुरे, हार, फुले, फेटे, मुकुट, फुलांच्या माळा आदींची खरेदी अधिक प्रमाणात झाली. त्याबरोबर गणरायाला प्रिय असणाऱया मोदकाची देखील मागणी वाढली होती. त्यामुळे स्वीटमार्ट दुकानातून मोदकाची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. पूजेच्या साहित्याबरोबर नारळ, सफरचंद, चिकू, डाळिंब, पेरू, मोसंबी यासह पाच नग असलेल्या फळांना देखील मागणी वाढली होती. त्याबरोबर श्रीफळ देखील मोठयाप्रमाणात मागणी होती.
कोरोनाच्या कालावधीत सणांवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे उत्सव मर्यादित स्वरुपात करण्यात आले होते. मात्र, यंदा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे बाजारपेठही विविध साहित्याने बहरली आहे. त्याबरोबर खरेदीलाही उधाण आल्याचे दिसत आहे. घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी थर्मोकोलचीही खरेदी होताना दिसत आहे. त्याबरोबर गणेशोत्सव काळात गणरायांच्या गाण्यांसाठी साऊंड सिस्टीमचीही खरेदी मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे बापट गल्लीतही गर्दी वाढत आहे.