प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करून सरकार जी मार्गसूची देईल, त्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत पुन्हा एकदा बैठक बोलावून त्यामध्ये निर्णय घेवू, असे आश्वासन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ आणि लोकमान्य महामंडळाला दिले.
यावषीच्या गणेशोत्सवावर बंदी घालण्याबाबत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आम्ही कोरोनाचे नियम पाळत गणेशोत्सव साजरा करू. बेळगाव गणेशोत्सवाला 100 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे यावषीही गणेशोत्सव साजरा करण्यास आम्हाला मुभा द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ आणि इतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली आहे.
कोरोनामुळे देशच नाही तर संपूर्ण जग तणावाखाली आहे. त्यामुळे प्रत्येकानेच याबाबत गांभीर्य घेणे महत्त्वाचे आहे. सरकार जे नियम सांगेल त्या प्रमाणे आम्ही नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करणार आहे. काही गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जून महिन्यापासूनच गणेश उत्सव मंडळे हालचाली सुरू करतात. प्रथम गणेशमूर्तीची ऑर्डर देतात. त्यामुळे आता सर्वच गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तीची ऑर्डर दिली आहे. तेंव्हा त्याचा गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला गणेशोत्सव साजरा करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गणेशोत्सव मंडळांकडून हेस्कॉम वीज बिलासंदर्भात डिपॉझिट घेत आहे. ती डिपॉझिट घेऊ नये. सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करून आम्हाला दरवषीप्रमाणे मुभा द्या, असे विचार अनेकांनी व्यक्त केले. यावर पोलीस आयुक्त के. त्यागराजन व जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. मात्र कोरोनामुळे याबाबत सरकारच निर्णय घेणार आहे. तेंव्हा तुमच्या भावना आम्ही सरकारकडे पोहचवू, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनीही गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सरकारकडे सर्व माहिती पाठवून देऊन त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार पुढील बैठक बोलविली जाईल, असे सांगितले. यावेळी अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी उपस्थित होते.
या बैठकीला मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, जनरल सेपेटरी शिवराज पाटील, रमाकांत कोंडुसकर, सुनील जाधव, अर्जुन रजपूत, गजानन देवरमनी, रवी कलघटगी, नितीन जाधव, विजय जाधव यांच्यासह इतर मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.