गरज पडल्यास गणेश भक्तांना ऑनलाईन पद्धतीने सहकार्य करणार , सत्तरीतील ब्राह्मण मंडळाची बैठक
प्रतिनिधी / वाळपई
सध्या जागतिक स्तरावर कोरोना रोगाची महामारी वाढल्यामुळे गणेश चतुर्थीच्या काळात त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात .यामुळे गणेश चतुर्थीच्या दरम्यान ब्राह्मणाकडून करण्यात येणारी पूजाअर्चा यंदा होणार नाही .यामुळे गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती समोर स्वतः पूजा करून ब्राह्मणांना सहकार्य करावे यासाठी गरज भासल्यास ऑनलाईन पद्धतीने गणेश भक्तांना मार्गदर्शन करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय सत्तरी तालुक्मयातील ब्राह्मण संघटनेने घेतला आहे.
यामुळे सत्तरी तालुक्मयातील कोणत्याही घरामध्ये हे ब्राह्मण पूजेसाठी जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सत्तरी तालुक्मयातील ब्राह्मण मंडळाची एक महत्वाची बैठक आज बिंबल येथील महागणपतीच्या मंदिरात संपन्न झाली .
याप्रसंगी व्यासपीठावर विनायक भावे संजीव अभ्यंकर ,पांडुरंग जोशी, उदय जोशी,प्रकाश भावे यांची खास उपस्थिती होती. यावेळी एकूण परिस्थितीवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या महत्त्वाच्या चर्चेत यंदाच्या गणेश चतुर्थीच्या दरम्यान गणेशमूर्ती समोर होणाऱया विविध स्वरूपाच्या पूजा यामध्ये ब्राह्मण भाग घेणार नसून यातून रोगाची महामारी फैलावण्याची भीती असल्याने गणेशभक्तांनी सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे.
आज घेण्यात आलेल्या बैठकीत गणेशमूर्ती समोरील पूजाअर्चा मध्ये ब्राह्मण संघ भाग घेणार नाही. सत्तरी तालुक्मयातील कोणत्याही घरामध्ये पूजेसाठी ब्राह्मण जाणार नसल्यामुळे गणेशभक्तांनी ही प्रक्रिया स्वतः पार पाडावी यासाठी आवश्यक स्वरूपात लागणारे सहकार्य ब्राह्मणाकडून करण्यात येणार असून सर्वांच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे दिलीप क्षत्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोना रोगामुळे आज सर्वांची परिस्थिती बिकट झालेली आहे. हे मान्य आहे मात्र यंदा या रोगाचा अतिरेक सुरू झाल्यामुळे ही साथ कोणत्याही क्षणी कुणामार्फत पसरण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे ब्राह्मण यासाठी कारणीभूत ठरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचे पालन सर्वांनी करावे अशा प्रकारचे आवाहन विनायक भावे यांनी केले आहे. संजीव अभ्यंकर यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना गणपती विसर्जनापर्यंत ब्राह्मण या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाहीत. कारण तसे केल्यास अनेकांचे जीव धोक्मयात येण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यदाकदाचित ब्राह्मण किंवा गणेशभक्त पॉझिटिव्ह असल्यास हा संसर्ग सदर गावांमध्ये पसरण्यास अजिबात विलंब लागणार नाही. यामुळे आज सर्वांच्या घरांमध्ये स्मार्टफोन आहेत .त्यांनी गुगलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने गणपतीचे पूजा करण्याची पद्धत शिकून घेऊन त्याची अंमलबजावणी केल्यास सर्वांनाच याचा फायदा होणार असून सर्वांचेच आरोग्य सुरक्षित राहणार आहे.