प्रतिनिधी /बेळगाव
गणेश चतुथीनिमित्त मध्यवर्ती बसस्थानकातून विविध मार्गांवर जादा बसेस धावणार आहेत. गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसस्थानकातून हुबळी, धारवाड, हावेरी, चिकोडी, गदग, बागलकोट यासह इतर ठिकाणी विशेष बस धावणार आहेत.
गणेश चतुर्थीनिमित्त ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीखातर परिवहनने हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाला शासनाने नियमावली जारी केली आहे. तसेच गणेशोत्सवाला परवानगी दिली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असते. त्यामुळे वातानुकूलित, आराम बस अतिरिक्त सोडल्या जाणार आहेत.
बुकिंगची व्यवस्था
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था केली आहे. KSRTC.karnataka.gov.in या वेबसाईटवर तिकीट बुकिंग करू शकता. शिवाय बसस्थानकात बुकिंगची व्यवस्था केली आहे.