प्रतिनिधी / म्हापसा
पर्रा-बार्देश येथील श्री गणेश मंडळ ट्रस्टची बैठक होऊन तीन वर्षांच्या मुदतीसाठी प्रदीप व्ही. मोरजकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणेः सचिव चंदनन (चंदू) व्ही. हरमलकर, खजिनदार नामदेव व्ही. पार्सेकर, उपाध्यक्ष आनंद एस. नारोजी, उप सचिव श्रीकृष्ण आर. पर्रीकर, उपखजिनदार गोविंद ए. नार्वेकर, सदस्य ः प्रदीप एस. मयेकर, अनिल डी. कायसूकर, मोहन जी. च्यारी, भावेश आर. मोरजकर, अनिल व्ही. मोरजकर, वसंत (अप्पू) व्ही. पेडणेकर, राजेंद्र आर. कायसूकर, गुरुदास सी. कुडव, प्रेमानंद आर. रेडकर.
गणेश मंडळ पर्राची स्थापना 1946 मध्ये होऊन 21 दिवशीय सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. 2006 मध्ये वरद सिद्धिविनायक मूर्तीची स्थापना करून मंदिर उभारण्यात आले. श्रीमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मंदिरात येतात. 2018 मध्ये सभागृहाचे काम पूर्ण झाले. सभागृहाच्या बांधकामासाठी अथक प्रयत्न केल्याबद्दल मागील समितीच्या सर्व सदस्यांचे विद्यमान समितीने आभार व्यक्त केले आहेत. विश्वस्त तसेच हितचिंतकांच्या योगदानाबद्दलही समितीने धन्यवाद दिले आहेत. मानवतेचा प्रसार करणे, हे समितीचे मुख्य ध्येय आहे.
विद्यमान समितीच्या भावी योजना
धार्मिक शिक्षणाद्वारे नैतिक मूल्ये प्रसारित करणे, दुसऱया मजल्यावरील नवीन हॉलचे काम, पार्किंगसाठी जमीन खरेदी, संगीत व नृत्य वर्ग, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, नेत्रशिबिर, रक्तदान शिबिर आदी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन, बेरोजगार युवा व बचत गटांना उद्योजकता प्रशिक्षण, जातीय सलोखा वाढवणे, कला व संस्कृतीचा प्रसार करणे, साथीचे आजार व नैसर्गिक आपत्तीच्यावेळी लोकांना मदत करणे, देश घडविण्यासाठी तरुणांना तयार करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, करियर मार्गदर्शन आदी विविध उपक्रम राबविण्याचे विद्यमान समितीने ठरविले असल्याची माहिती श्री गणेश मंडळ पर्रा ट्रस्ट, बार्देशचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप मोरजकर यांनी दिली आहे.