सेन्सेक्स 193 अंकानी वधारला : निफ्टी 12,052.95 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील आठवडय़ात इराणचा लष्कर प्रमुख कासिम सुलेमानी यांचा ड्रोनचा वापर करुन खात्मा केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारासोबत अन्य व्यापार क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या शुक्रवारी या घटनेमुळे अमेराका आणि इराण यांच्यातील तणावाचे पडसाद कच्च्या तेलाच्या किमती वधारण्यास कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे दररोज खनिज तेलाच्या किमती थोडय़ा-थोडय़ा किमतीने वाढत असल्याची नोंद देशातील बाजारात करण्यात येत आहे.
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी मात्र मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 700 अंकानी कोसळला होता. त्यामुळे व्यापारसह गुंतवणुकदारा मोठय़ा काळजीत राहिले होते. परंतु दुसऱया सत्रात मंगळवारी मुंबई शेअर बाजारात चढउताराच्या वातावरणानंतर 553.51 अंकावर कार्यरत राहिला होता. तर बाजाराने गमावलेली तेजी पुन्हा मिळवली आहे. दिवसभरातील व्यवहारात दिवसअखेर सेन्सेक्स 192.84 अंकानी वधारुन निर्देशांक 40,869.47 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 59.90 अंकानी वाढून निर्देशांक 12,052.95 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग 2.10 टक्क्यांनी वधारले आहेत. तर एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, एनटीपीसी आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग तेजीत राहिले होते. दुसऱया बाजूला इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, हिरोमोटो कॉर्प आणि पॉवरग्रिड यांचे समभाग मात्र लाला निशाण्यावर बंद झाले आहेत.
आर्थिक विकासदर 2019-20 मध्ये 5 टक्क्यांवर राहणार असल्याचे अनुमान आगामी अर्थिक वर्षासाठी पहिलेच अनुमान सरकारकडून मांडले आहे. त्यामुळे या आकडेवारीचे पडसाद आज बाजारातील व्यवहारांवर होणार असल्याचे संकेत शेअर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.