प्रतिनिधी / शाहुवाडी
कोरोना ग्रस्त रुग्णानांना ऑक्सिजन त्वरीत मिळावा यासाठी हवेतून तयार केला जाणारा ऑक्सीजन प्लांट मलकापूर व कोडोली येथे तात्काळ उभारले जाणार आहेत. त्या बरोबरच आमदार निधीतून गरजू गरीब रुग्णांना कोरोनावरील महाग औषधे मोफत देण्यासाठी काय तजवीज करावी लागेल याची माहिती तात्काळ प्रशासनाने द्यावी असे प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी येथे आयोजित आढावा बैठक प्रसंगी केले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक. त्या उपाययोजनेसाठी सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
शाहूवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व यावर उपाययोजना याबाबत शाहुवाडी पन्हाळा चे आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील , तहसिलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे ,पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, नगराध्यक्ष अमोल केसरकर , माजी उपसभापती महादेव पाटील , विष्णू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या व त्यावर केलेली उपाययोजना याबाबत सर्व संबंधित विभागाकडून आढावा घेतला आमदार निधीच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना साठी सर्वतोपरी मदत केली जाणार असून प्रशासनाने आवश्यक त्या बाबींचा तात्काळ अहवाल सादर करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली तर कोरोनावर महाग असणारी औषध गरीब रुग्णांना आमदार निधीतून मोफत देण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ती माहीती तात्काळ कळवावी व आमदार निधीच्या माध्यमातून ती देण्यात येईल लसीकरणाचे तालुक्यात अतिशय उत्कृष्ट काम झाल आहे. याबद्दल आरोग्य विभागाचे विशेष कौतुक आहे त्याबरोबरच दुसऱ्या टप्प्यातील लसीचा दुसरा डोसचा जास्त प्रमाणात पुरवठा व्हावा याबाबत ही विशेष प्रयत्नशील राहणार असून हा डोस सर्व पर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष सतर्कता घ्यावी दरम्यान मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे 18 ते 44 वयोगटातील लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी नगराध्यक्ष अमोल केसारकर, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक दिलीप पाटील , नगरसेवक अशोक देशमाने यांनी आमदार विनय कोरे यांच्याकडे केली.
या आढावा बैठकीस सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप कोटकर ,पोलिस निरीक्षक विजय पाटील, मलकापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे ,मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आशुतोष तराळ, यांच्यासह आंबा ,शितुर, भेडसगाव , सरूड , बांबवडे , माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, उपस्थित होते.