मक्यापासून विविध पदार्थ बनवता येतात. तुम्ही न्याहरीसाठी किंवा संध्याकाळी खाण्यासाठी स्वीट कॉर्न टिक्की म्हणजेच मक्याचं कटलेट करू शकता.
साहित्य : दोन उकडलेले बटाटे, दोन ते तीन चमचे बेसन, अर्धा कप उकडलेले स्वीट कॉर्न, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, एक इंच आलं, अर्धा चमचा चाट मसाला, चार ब्रेड स्लाईस, अर्धा कप पोहे, मीठ आणि कोथिंबिर .
कृती : उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्या. एका वाटीत स्वीट कॉर्न घेऊन त्यात कुस्करलेले बटाटे घाला. ब्रेड स्लाईस मिक्सरमध्ये वाटून चुरा करून घ्या. हा चुरा बटाटा आणि स्वीट कॉर्नच्या मिश्रणात घालून सर्व घटक नीट मिसळून घ्या. अर्धा कप पोहे धुवून थोडा वेळ भिजवून ठेवा. पोह्यातलं पाणी काढून त्यांचा चुरा करून बटाटय़ाच्या मिश्रणात घाला. त्यात बेसन घालून मिसळून घ्या. आता आलं आणि हिरवी मिरची वाटून या मिश्रणात घाला. चाट मसाला, मीठ, कोथिंबिरही घाला. आता या मिश्रणाचा गोळा करून त्याला कटलेटचा आकार द्या. तव्यावर थोडं तेल घालून टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्या. हिरव्या चटणी तसंच सॉससोबत खा.