- शुक्रवारी लसीकरणाची रंगीत तालीम
ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आठ जानेवारीला कोरोनाप्रतिबंधक लसीकरण याचा रंगीत तालमीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.
राज्यातील गरिबांना कोरोनाची मोफत लस उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. गरिबांवर लशीचा आर्थिक भार टाकले योग्य नाही गरिबांना दिला जाणारा लसींच्या खर्चाबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री योग्य मार्ग काढतील असेही ते यावेळी म्हणाले.
यापूर्वी राज्यात 2 जानेवारीपासून नंदुरबार, नागपूर, जालना आणि पुणे या चार जिल्ह्यात लसीकरणाची लग्न रंगीत तालीम झाली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96% आसपास आहे. यासोबतच कोरोनाच्या या विषयांबाबत सरकार सतर्क आणि ब्रिटनहुन आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण ठेवण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
केंद्राने मान्यता दिलेल्या कोरोनाच्या लशींसंदर्भात केंद्र सरकार करून राज्य सरकार काही स्पष्टीकरण मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.