प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या गरीबी रेषेखालील व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी 1 लाख रुपये मंजूर करण्यासंबंधी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंबंधी तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांनी संबंधितांना आवाहन केले आहे.
भरपाई मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज नमुना क्रमांक एकमध्ये विचारलेली माहिती भरून कोरोनाची लागण झाल्यासंबंधीचा डॉक्टरांकडील अहवाल, रेडिऑलॉजी व प्रयोगशाळेचा अहवाल, मृताचे आधारकार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, बीपीएल कार्ड, अर्जदारांचे आधारकार्ड, बँक पासबुक आदी 10 झेरॉक्स सोबत जोडायचे आहेत.