चेन्नई
ड्रोन निर्मितीच्या कार्यामध्ये असलेली स्टार्टअप कंपनी गरुड एअरोस्पेसने 2025 पर्यंत 6 लाख ड्रोन बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या अंतर्गत 6 लाख जणांना रोजगाराची संधी उपलब्ध केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच पंतप्रधानांनी गुरगाव व चेन्नई येथे कृषी ड्रोन उत्पादन प्रक्रियेचे उद्घाटन केले होते. या अंतर्गतच गरुड एअरोस्पेस वरील संख्येत ड्रोनची निर्मिती करणार आहे.