शेतकऱयाच्या मेहनतीनंतर कान्हाच्या बागेत फुलली रंगीबेरंगी देशी-विदेशी फुले
जेव्हा एखादी व्यक्ती कठोर परिश्रम करते तेव्हा काहीही बदलू शकते. उत्तर प्रदेशातील बिजौली येथील हनुमान मंदिराच्यामागे पूर्वी जिथे खडकाळ जमीन होती, तिथे काहीही पिकत नसे. मात्र आता शेतकरी व मजुरांच्या मेहनतीमुळे आज रंगीबेरंगी देशी-विदेशी फुले बहरली आहेत. ही फूलबाग पाहण्यासाठी दररोज शेकडो लोकही येथे पोहोचत आहेत. काही दिवसांत कान्हाच्या बागेच्या नावाने प्रसिद्ध झालेले हे ठिकाण आता लोकांना आकर्षित करताना दिसत आहे.
काही काळापर्यंत येथे काहीही नव्हते. मांजरी फाऊंडेशन आणि गणपती रिसॉर्ट यांनी ही जागा घेऊन ग्रामीण जनतेच्या साथीने येथे कान्हाची बाग विकसित करण्यात आली आहे. आता या बागेत विविध प्रकारची फुले बहरू लागली आहेत, असे कान्हाच्या बागेत काम करणाऱया सत्यवीरने सांगितले. बॉटल पाम, कोस्टल पाम, सायकल पाम, पेंड, रेड हेज, ऍपल प्लमसह पिवळे हेज, मॅटेस ग्रास, टपोरी यांच्यासह डझनभर रंगीबेरंगी झाडे आणि काही विदेशी प्रजाती देखील या बागेत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.