कोकरूड/प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील गवळेवाडी येथील ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून साकारलेल्या गवळेवाडी जि. प. शाळेत आकर्षक कमान, जलकुंभ, येसाबाई उद्यान, तसेच चित्रसृष्टी उभारल्याने शाळेचे रुपडे पालटले आहे. याचा परिणाम शाळेचा पट संख्येवर झाला असून शाळेची पट संख्या २९ वरून ६३ वर पोहोचल्याने या शाळेची वाटचाल मॉडेल स्कुलच्या दिशेने सुरु झाली आहे.
गवळेवाडी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील व सहकारी उपक्रमशील शिक्षक प्रकाश सावंत यांनी शाळेत अनेक उपक्रम राबवून शाळेचा गुणवत्ता स्तर वाढविला असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका ,जिल्हास्तरावर व्यक्तिमत्व आणि क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. प्रज्ञा शोध परिक्षेत राज्यात दोन क्रमांक मिळवून शाळेचा लौकिक वाढविला. पालकांच्या विश्वासास पात्र ठरल्याने शाळेचा पट २९ वरुन सध्या चालू वर्षात ५३ झाला आहे. अशा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना लोकसहभागाची साथ मिळाल्यास मराठी शाळांना गतवैभव प्राप्त होईल.