सरकारकडून 2021-22 मधील आकडेवारीचा समावेश
नवी दिल्ली
चालू वर्षात 2021-22 च्या रब्बी व्यापारी सत्रात आतापर्यंत 433.24 लाख टन गव्हाची विक्रमी खरेदी केली असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. धान्य खरेदीबाबतीत सरकारने खरीप व्यापारी सत्र 2020-21 (ऑक्टोबर-सप्टेंबर) मध्ये चार जुलैपर्यंत विक्रमी 862.01 लाख टन खरेदी केली आहे. यापूर्वीचा 2020-21 (एप्रिल-मार्च) 389.93 लाख टनाचा विक्रम होता.
गहू खरेदीचा विक्रम
गहू खरेदी हंगामा समाप्त होत असून यामध्ये आम्ही गव्हाच्या खरेदीत नवा विक्रम प्राप्त करत अन्य विक्रम मोडीत काढले असल्याचे खाद्य सचिव सुधांशु पांडे यांनी सांगितले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मिर यांनी गव्हाच्या उत्पादनात झेप घेतली आहे.