नवी दिल्ली
सरकारने रब्बी विपणन सत्रामध्ये आतापर्यंत एमएसपीवर आधारीत 70.36 कोटी रुपयाच्या किमतीच्या 34,917 टन गव्हाची खरेदी केली आहे. अशी माहिती अन्न विभागाच्या अधिकाऱयांनी दिली. देशामध्ये रब्बी सत्र एप्रिल ते मार्चपर्यंत चालते. एप्रिल ते जून या कालावधीदरम्यान घाऊक खरेदी करण्यात येते. उपलब्ध माहितीनुसार मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यांमधील रब्बी सत्र 2022 ते 23 दरम्यान गव्हाची खरेदी सुरु करण्यात आली आहे.