प्रतिनिधी/ रत्नागिरी
बहुप्रतीक्षीत असलेली मत्स्य विभागाच्या नौकेबाबत निविदा प्रक्रिया पार पडली आह़े पुढील दोन-तीन दिवसांमध्ये ही मत्स्यनौका मत्स्य विभागाच्या ताब्यात येणार असल्याची माहिती मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी ड़ॉ रश्मी आंबुलकर-नाईक यांनी दिल़ी
ही नौका निविदा प्रक्रिया राबवून भाडेतत्वावर घेण्यात आली आह़े परप्रांतीय मासेमारी नौका जिल्हय़ाच्या हद्दीमध्ये घुसून येथील मासळीची लूट करतात़ त्यामुळे या घुसघोरीला आळा घालण्यासाठी मत्स्य खात्याकडे गस्तीनौका नव्हत़ी अखेर निविदा प्रक्रिया राबवून ही नौका घेण्यात आली आह़े दापोली तालुक्यातील पालघर येथील ही नौका असल्याचे मत्स्य अधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे घुसघोरी करणाऱया नौकांना चाप बसणार आह़े गेले काही दिवस येथील मच्छीमांराना कोटींची मासळी मिळत आह़े या बद्दलचे व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे परप्रांतीय मच्छीमारांची नजर येथील मासळीवर पडली आह़े या पार्श्वभूमीवर या गस्तीनौकेचे महत्व वाढले आह़े